‘बनगरवाडी’तला पाऊस !

“मे महिना संपला आणि जून आला. उन्हाळा संपला व पावसाळा आला. इंद्रगोप दिसू लागले आणि मृग निघाला. आभाळ झाकोळून आले. स्वच्छ उन्ह नाहीसे झाले.वारा सुटला. झाडेझुडे गदगदू लागली. धूळमाती चौफेर उडू लागली. आभाळाकडे पाहून लोक म्हणू लागले,”वारा पाउस घालवील’. प्ण तसे झाले नाही.
सडासडा धारा आल्या.मृगाचा पाऊस बनगरवाडीला झोडपत राहीला. भटकी कुत्री
भिंतीच्या आडोशाला उभी राहीली. लवकर उघडीप होण्याचे दिसेना. धनगराची धावाधव झाली.डोक्यावर रिकामे पोते घेऊन त्यांनी वाड्यात भिजणारी मेंढरे काढून झोपड्यात आणली.घरात दाटीवाटीने उभ्या राहिल्या राहिल्या मेंढरांनी अंगे झाडली. भिजल्या लोकरीच्या वासाने धनगराची घरे दरवळली. सरीवर सरी आल्या. तापअलेल्या जमिनीतून वाफा निघाल्या. धूळ उडाली. चिखल झाला आनि मग तोही वाहून गेला. खडे उघडे पडले.
काडाने शाकारलेली घरे गळू लागली. सुरेख सावरलेली जमीन ठिकठिकाणी ओली होऊन उखणू लागली, तेंव्हा धनगरणी चरफडल्या आणि गळणाऱ्या जागी त्यांनी लहानमोठी भांडी ठेऊन दिली.मेंढराच्या धडापडीतूनही भरलेल्या भांड्यात ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज कान किटवू लागला. धाब्याच्या घरातून गळू लागले. तेंव्हा डोक्यावर रिकामे पोते घेऊन धनगर माळवदावर चढले. जिथे पाणी साचले होते, माळवदाला भोक पाडून आत शिरत होते, ती भोके त्यांनी दगडमाती घालून तात्पुरती बुजवली.

हवे मध्ये गारवा आला.धनगरांच्या कुऱ्हाडींवर गंज धरू लागला आणि धनगरणींनी साठवून ठेवलेले मीठ पाझरू लागले.

पोपटी रंगाच्या गवताने जमिनीतून डोकी वर काढली. अंगणात, माळवदावर, छपरावर,- जिथे उगवू नये तिथे गवत उगवू लागले. सर्वत्र झगझगीत पोपटी रंग दिसू लागला…

नांग़रून पडलेल्या जमिनीतील ढेकळे विरघळली. जमिनींनी पाणी पिऊन घेतले…
माळरान भिजले आणि हिरव्यागार माळावर काळीभोर मेंढरे हिंडू लागली आणि त्यांच्या पाठीवर बसून काळे कोतवालपक्षी घोगरा आवाज काढू लागले. कुणाच्याही दृष्टीस न पडण्याची खबरदारी घेऊन चित्तर उंच स्वरात ओरडू लागले.

Comments off

यात काही पाप नाही

 

Comments off

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !
सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायल नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

                                                           – मंगेश पाडगावकर

Comments off

खाली डोकं वर पाय

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
                                                    – मंगेश पाडगावकर

Comments off

PuNeri Patya

 

 

Comments (7)

डाँयलाग

रिश्तें मे तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह

- शहेनशाह

बचपन से है सरपर अल्ला का हाथ और अल्लारखा हैं मेरेसाथ. बाजूपर है सातसौ छिायासी का बिल्ला, बीस नंबर का बीडी पीता हूँ काम करता हूँ कूलीका और नाम है इक्बाल

- कूली

मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ!

मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता

- दीवार

मेरा नाम है प्रेम, प्रेम चोपडा

आप की आँखे जिधर देखती हैं, एक रिश्ता सा कायम कर लेती हैं

- कभी कभी

कौन कम्बख्त जीने के लिए पीता है? मैं तो पीता हूँकि बस साँस ले सद्माूँस!

मैं तुम्हे भूल जाऊँ ये हो नही सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूँगा!

- धडकन

आप स्वामी है, दानी हैं, अंतर्यामी है, शक्तिमान है, बुद्धिमान है बल्कि मैं तो कहता हूँ आप पुरुष ही नहीं हैं… महापुरुष हैं!

- अंदाज अपना अपना

मूछे हो तो नथ्थुलाल जैसी, वरना ना हो!

- शराबी

रोये तो यार के कंधे पर, जाये तो यार के कंधे पर

- संगम

मर्द को दर्द नहीं होता

- मर्द

डाँग कभी राँग नहीं होता

- तहलका

Comments off

काही प्रश्न :

1. बॅटरी डाउन झालेल्या रिमोटची बटणं आपण जोराने का दाबतो?

2. खात्यात पुरेसे पैसे नसताना बँका त्याबद्दल त्याच खातेधारकाच्या त्याच खात्यावर दंड का आकारतात?

3. आकाशात चार अब्ज तारे आहेत, यावर विश्वास ठेवणारे, भिंतीचा रंग ओला आहे, असं सांगूनही बोट लावून चेक का करतात?

4. बाटलीतला डिंक बाटलीला का चिकटत नाही?

5. विषारी इंजेक्शन देताना सुई जंतूनाशक का करून घेतली जाते?

6. सुपरमॅनवर गोळ्या झाडल्या, तर तो त्या छातीत झेलतो. तोच सुपरमॅन रिवॉल्वर फेकून मारल्यावर ती का चुकवतो?

7. जपानच्या आत्मघातकी पथकातील कामिकाझे पायलट हेल्मेट का घालतात?

8. माणसाची माकडापासून उत्क्रांती झाली असेल, तर अजून माकडं शिल्लक कशी?

Comments off

जोक.

‘ महाराज, महाराज, माझी मुक्तता करा महाराज,’ गजाननरावांनी स्वयंसिद्ध बापूंच्या पायावर लोळण घेतली. ‘कशातून मुक्तता हवी आहे तुला बाळ?’, बापूंनी विचारले. ‘सुमारे 35 वर्षांपूर्वी उच्चारण्यात आलेल्या एका महाभयंकर शापवाणीतून मुक्तता करा माझी सद्गुरू!’

‘ काय होती ती शापवाणी?’

‘ शुभमंगल सावधान…!!!’

……………………

‘ बापू, मला वाचवा,’ पुन्हा गजाननरावांनी स्वयंसिद्ध बापूंच्या पायावर लोळण घेतली.

कपाळावर हात मारून घेत बापूंनी विचारलं, ‘आता कशातून वाचवू?’

‘ महाभयंकर प्रसंग ओढवलाय माझ्यावर. माझी बायको विषप्रयोग करतेय माझ्यावर.’

‘ ठीकाय. मी आधी बोलतो गजराबाईंशी. मग सांगतो तुला काय करायचं ते!’…

… दुसऱ्या दिवशी गजाननरावांनी काही बोलायच्या आतच विलक्षण थकले भागलेले बापू म्हणाले, ‘बाळ, मी बोललो तुझ्या बायकोशी… जवळजवळ तीन तास फोनवर ऐकत… आय मीन, बोलत होतो मी… माझं ऐकशील तर ते विष निमूटपणे पीत राहण्यातच तुझं अंतिम हित आहे!!!’

Comments off

आधुनिक म्हणी

१. आधीच MTNL आणि त्यात पावसाळा.
२. आपला तो स्वातंत्र्यसैनिक आणि दुसर्‍याचा तो दहशतवादी.
३. सरकारी काम आणि दहा वर्षे थांब.
४. ‘काय द्या’ नी बोला.
५. भक्त जातो देवापाशी, चित्त त्याचे चपलांपाशी.
६. घरोघरी फ़ॅशनेबल पोरी.
७. मरावे परि व्हिडिओकॅसेटरूपी उरावे.
८. रिकामा मंत्री उदघाटन करी.
९. गरज सरो अन मतदार मरो.
१०. कशात काय अन खड्ड्यात पाय.
११. इन्कम थोडे अन पोरे फ़ार.
१२. उचलली लिपस्टीक अन लावली ओठांना.
१३. तुका म्हणे भोग सरे, पास होता रद्दड पोरे.
१४. कॉल आला होता पण नोकरी लागली नाही.
१५. चार तास अटकेचे अन चार तास सुटकेचे.
१६. पाहुणा गेला अन चहा केला.
१७. म्हशी मेल्या अन चारा संपला अन हाती घोटाळा आला.
१८. बसेन तर खुर्चीवर.
१९. मंत्र्याचे बिर्‍हाड दौर्‍यावर.
२०. आपलेच गोलंदाज आणि आपलेच फ़लंदाज.
२१. गाढवापुढे वाचली गीता अन वाचणाराच गाढव.

Comments (1)

मराठी लोकांचे हिन्दी …

हा किस्सा रामटेकला आमच्यासमोर घडलेला. ३-४ आज्यांचा एक group आपली नातवंड घेऊन आला होता. मुलं water bottle मधलं पाणी पिऊन चुळा भरत होती आणि तेच पाणि तोंडातून एकमेकांच्या अंगावर उडवत होती. शेजारी एक पंडितजी आणि यजमान कसलीशी पूजा करत होते. पोरांचं पाणी उडवणं बघून पंडितजी आज्यांना म्हणाले,
“अपने बच्चोसे कहो की वो अपना कुल्ला (म्हणजे गुळणी) उधर करे, इस तरफ नही. हम पूजा कर रहे है”.
ह्यावर एक आजी उत्तरल्या,
“हमारे बच्चोके कुल्लेसे भटजी, तुम्हे क्यो इतनी परेशानी, सब चड्डी पहेने है”!
तो बाबा बिचारा खजील! वर ह्या आजी इतर आजांना म्हणतात,
“पाहीलं, पूजेत लक्ष नाही भटजी बुवाचं”!

नुकतेच कणेकरांच्या एका पुस्तकात वाचलेला हिंदी संवाद

`घर मै माजी है|`
`यहां माजी कोइ नही, बहेनजी हई` पत्नीचे फणकार्यात उत्तर.
`बहेनजी, आप साबुन कौनसा इस्तेमाल करती हो?`
`मेरेकू ईंपोर्टेड पिअर्स पसंद है, लेकिन परवडता किसको है? ये कवडीचुंबक का घर है`
`तो आपका परिवार कौनसा साबुन इस्तेमाल करता है?`
`परीवार तो घरके मालिक जैसाही बेशरम है. तीन दिन से मै घसा खरवडके चिल्ला रही हुं के साबुन संपा है, लेकिन किसीको ढीम्म नही है. महागलीच्छ परीवार है. मेरे माहेरकू हर आदमी का वेगळा वेगळा साबुन था. एक दिन चुकीसे मेरी माँने टायगर का साबुन लिया तो भडक के मेरे पिताने पूरी साबुनकी वडी गिळी थी. उससे उनका आतडा स्वच्छ हुआ. इतने स्वच्छ परिवारसे मै इस गलिच्छ परिवार मे आ गयी क्यों के मेरा नशीब फ़ुटका था…`
`तीन दिनसे पहेले आप कौनसा साबुन इस्तेमाल करती थी?`
`ये कार्यक्रम करने बाहरगाव गये थे ना, वहां के हॉटेलसे चुराके लेके आये वही छोटी वडी इस्तेमाल करते थे. इनका की नाई नवस है के साबू विकत आणनेका नही, हॉटेलसे चोरनेका……..
मी हा किस्सा एका मासिकात वाचला आहे.. मराठी कुटुंबाची मध्य प्रदेशातल्या गावात बदली झाली. बाई ला हिंदी येत नव्हते, पण शेजारणींशी बोलायची हौस.

शेजारणीनी विचारल: दोपहर मे क्या करती हो?
उत्तर: घर का काम होगया ना, तो थोडा “गिरती” हूंॅ!!! -हे दुपारी थोड “पडते” च शब्दश: translation !

शेजारीण: क्या? गिरती हो?
उत्तर्: हां उस्मै क्या है? हमारे गाव्मे रोज ही हम सब बाई लोग दोपहर को थोडा थोडा “गिरते” है!!!!!!!

Comments (1)

« Previous Page« Previous entries « Previous Page · Next Page » Next entries »Next Page »